पहिल्या पिढीतला नास्तिक
मी स्वतःला ‘पहिल्या पिढीतला नास्तिक’ म्हणत नाही आणि ही संज्ञा मी शोधलेली नाही, तरीही, ही संकल्पना मला इतकी भावली, की मी त्या विषयावर माझे विचार आणि आस्तिक-नास्तिक वाद-संवाद या संदर्भातले माझे अनुभव व्यक्त करायचे ठरवले. लहानपणी घरचे वातावरण बुद्धिप्रामाण्यवादी होते, त्यामुळे घरात देवघर, पूजापाठ, व्रतवैकल्ये हे प्रकार अजिबात नव्हते, पण आजूबाजूला हे सर्वकाही भक्तिभावाने चालू …